प्रतिनिधी / सातारा :
उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत (लाभकारी मूल्य) साठी भारतीय किसान संघाचे देशव्यापी आंदोलन दि. 8 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाअंतर्गत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना नुकतचे देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे सातारा प्रमुख राजेंद्र पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारने ‘उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किमतीसाठी कायदा करावा’ अन्यथा भारतीय किसान संघ प्रारव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून संसदेत कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करेल. भारतीय शेतकरी आपले राष्ट्रीय दायित्व देखली चांगले समजतो, त्यामुळे निवेदनाच्या माध्यमातुन सरकारला चेतवणी दिली होती की येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सकारत्मक प्रयत्न किंवा आश्वासन द्यावे पण याबाबत कोणतीच हालचाल न केल्याने सदर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.