साहित्य : 2 मध्यम आकाराचे कांदे, 5 मध्यम आकाराचे टोमॅटो, 8 ब्राऊन ब्रेड बन्स, 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, आवश्यकतेनुसार बटर, 2 चमचे साखर, शालोफ्रायसाठी तेल
कृती : कांदा आणि टोमॅटो उभा पातळ चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात जिरं टाकून परतवावे. नंतर त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवून घ्यावा. आता त्यात टोमॅटो, लाल तिखट पावडर, मीठ आणि साखर टाकून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत परतवून घ्यावे. आता सुरीच्या सहाय्याने बन्सला मधोमध चिर द्यावी. नंतर गरम तव्या बन्स हलके परतवून घ्यावे. आता त्यात कांदा-टोमॅटोचे सारण भरून त्यावर हाताने हलक्यावर दाब द्यावे. आता गरम तव्यावर बन्स ठेवून दोन्ही बाजूने बटर अथवा तेल सोडून क्रिस्पी भाजून घ्यावे. आता तयार क्रिस्पी बन्स सॉस अथवा पुदिना सोबत खाण्यास देऊ शकता. अथवा तसेच खाण्यास देऊ शकता.