प्रतिनिधी / सातारा
सातारा शहराचे मध्यवस्तीमध्ये वेश्याव्यवसाय करणारी तसेच पोलीस रेकॉर्डवरील महिला सरिता बजरंग लाडी (रा.तोफखाना सातारा) हिस सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुणे येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे. तिला न्यायालयाने दि.२८पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तिच्यासोबत तिचा सहकारी आकाश शनि कांबळे (रा.दुर्गापेठ सातारा) याला ही सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सरिता लाडी हिच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात दि.१९/०६/२०२० रोजी गुन्हा रजि.नं.५५३/२०२० भा.द.वि.सं.कलम ३६३,३६६,३७६ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर ती महिला तिचे साथीदार हे गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार झाले होते. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व अद्यापपर्यंत आरोपींचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने अप्पर पो.अधिक्षक धिरज पाटील, सहा.पो.अधिक्षक श्रीमती आंचल व वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एन.एस.कदम यांना आरोपींचा कोणत्याही परिस्थीतीत शोध घेवुन अटककरण्याच्या सुचना दिल्या होत्या.
यानंतर नियोजनबद्दरित्या सापळा लावत व मुख्य सुत्रधार सरिता बजरंग लाडी हिस तिचे राहते फ्लॅटवर छापा घालुन ताब्यात घेतले. व तिच्याकडुन गुन्ह्यातील अन्य साथीदारांची नावे निष्पन्न करुन दुस-या दिवशी तिचा गुन्ह्यातील दुसरा साथीदार आकाश शनि कांबळे रा.दुर्गापेठ सातारा यास ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चारचाकी अशी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजय बन्सल, अप्पर पो.अधिक्षक धिरज पाटील, सहा.पो.अधिक्षक श्रीमती आंचल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम, सहा.फौज.विश्वास कडव, पो.हवा.वाघमळे, पोहवा. शेवाळे, पोना. भिसे, पोना.चव्हाण, पोकॉ. साबळे, पोकॉ. घाडगे, पोकॉ.कचरे, पो.कॉ.धुमाळ, पो.कॉ. भोंग यांनी सहभाग घेतला होता.