प्रतिनिधी /फोंडा
कुंडई औद्योगिक परिसरात पादचाऱयाचे मोबाईल फोन हिसकावून पलायन करणाऱया दोघा संशयिताना फेंडा पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संशयित योगेश शांबा कळंगुटकर (25, हेंडा सत्तरी) तसेच चोरीचे मोबाईल विकत घेणारा राजेश दयाराम हयवार (30, रा. म्हापसा) अशी त्यांची नावे आहेत. त्याच्याकडून रु. 30 हजार किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या दोन्ही घटना महिन्याभरापूर्वी पुंडई औद्योगिक वसाहत परिसरात घडल्या होत्या. मानसवाडा पुंडई येथील एका इसमाला दुचाकीवर लिफ्ट देण्याचे निमित्त करून उतरताना तातडीचा फोन करण्यासाठी मोबाईल मागून चोरटय़ाने दुचाकीने पलायन केले होते. दुसऱया घटनेत कुंडई औद्योगिक वसाहतीजवळ दुचाकीने आलेल्या चोरटय़ाने एका पादचाऱयाला वेळ किती झाला विचारल्यावर मोबाईलवर वेळ बघत असताना त्याचा किमती फोन हिसकावून पळ काढला होता. दोन्ही चोरीप्रकरणी मुख्य संशयित योगेश याचा सहभाग आहे. पोलिसांना प्रथम म्हापसा येथील राजेश दयाराम या विक्रेत्याला अटक केल्यानंतर मुख्य संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी दोघां संशयिताला फोंडा पोलिसांनी भा.दं.सं. 379 व 356 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केल्यानंतर दोघांनाही 14 दिवसाच्या रिमांडवर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत आहे.