सांगली / पलूस :
पलूस तालुक्यातील कुंडल ते बांबवडे या भागातील रस्त्याचे काम चालू करण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मोटर वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये दि. 7 जून 2021 ते 7 जुलै 2021 या कालावधीसाठी कुंडलफाटा ते पलूस शहर ते बांबवडे हा मार्ग चारचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना वाहतुकीस बंद करून त्यावरील वाहतुक कुंडलफाटा ते फॉरेस्ट ॲकॅडमीमार्गे ते बलवडी फाटा ते जुना सातारा रस्त्यामार्गे ते येळावीफाटा या अस्तित्वातील मार्गावरून वळविणे व वाहतुक सुरक्षा उपाययोजनाव्दारे वाहतुक नियंत्रित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर व पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी एकत्रितपणे कराव्यात, अशी अधिसुचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.