वार्ताहर / कुंडल
कुंडल येथील जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान असलेल्या गिरी पार्श्वनाथ पहाडावर पार्श्वनाथ तीर्थंकर भगवान यांची मुर्ती उत्खननामध्ये सापडली आहे.
जैन धर्मियांच्या दृष्टीने कुंडल येथील गिरी पार्श्वनाथ व झरी पार्श्वनाथ हे शिखरजी नंतर पवित्र तिर्थक्षेत्र आहे. ही तीर्थस्थाने कुंडल येथील सह्याद्री पर्वतरांगेच्या पुर्वेस शेवटच्या दोन पर्वतावर ही तीर्थस्थाने आहेत. काल तिर्थाटनासाठी आलेल्या महाराजांना गिरी पार्श्वनाथ पहाडावर दर्शनासाठी गेले असता जाणीव झाल्याने तीथे खोदकाम केले असता पार्श्वनाथ तीर्थंकर भगवान यांची बसलेल्या रुपातील मुर्ती सापडली. याची माहिती मिळताच भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.