वार्ताहर / कुंडल
कुंडल पलूस येथील शिक्षक कॉलनी परिसरातील रावसाहेब माने यांच्या घरातील सोने, चांदीच्या दागिण्यांवर चोरांनी डल्ला मारल्याने कुंडल परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत कुंडल पोलीसातुन मिळालेली माहिती अशी गुरुवारी रात्री विजेचा लपंडाव सुरू होता, त्याचवेळी रावसाहेब रेवूबा माने यांच्या घराची कडी मोडून अज्ञात चोरट्यांनी सोने व चांदीचे सुमारे 3 लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला.
शिक्षक कॉलनी परिसरात रावसाहेब माने राहात असून त्यांचा सोने – चांदी विक्रीचा व्यवसाय आहे. सराफ दुकानातील ऐवज घरी ठेवून मागील चार दिवसापुर्वी ते विसापूर ता. तासगांव येथे शेतीच्या कामानिमित्त गेले होते. दरम्यान काल रात्री अत्रात चोरट्यांनी त्यांच्या घराचा लॉक तोडून घरातील लाकडी कपाटातील सुमारे तीन लाख रूपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले असल्याचे कुंडल येथील राहत्या घरी आल्यावर फिर्यादी रावसाहेब माने यांच्या निर्दशनास आले. त्यांनी कुंडल पोलीसांत याबाबत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.