ऑनलाईन टीम :
भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्याच आयोजन करण्यात आलं होत. परंतु कुंभमेळा सुरु असताना कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्वरित कुंभमेळा प्रतीकात्मक ठेवण्याची सूचना केली होती. यांनंतरही कोरोना रुग्णसंख्या वाढतच राहिली. त्यामुळे उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात ही वाढ झाली.
उत्तराखंडमध्ये १ एप्रिल ते ७ मे या दरम्यान अधिकाधिक कोरोना रुग्णवाढ झाली. यामुळे नव्या तब्बल १ लाख ३० हजार कोरोना रुग्णांची भर पडली आणि ही कोरोना रुग्णसंख्या उत्तराखंडच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मे आहे. त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १७१३ मृत्यू हे १ एप्रिल ते ७ मे या दरम्यान झालेले असून १ मे ते ७ मे या आठवड्याभरातच उत्तराखंडमध्ये तब्बल ८०६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार फक्त एप्रिल महिन्यात उत्तराखंडमधल्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.
काल नोंदवण्यात आलेली संख्या ही उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या म्हणजे ९ हजार ६४२ इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे आता उत्तराखंडमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २ लाख २९ हजारांवर पोहोचला आहे.