प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील १८ गाव मोरे राव संचलित कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने २६ व २७ डिसेंबर या कालावधीत सह्याद्रीच्या कुशीत गिर्यारोहण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत जावळीच्या घनदाट व दुर्गम खोऱ्यात ‘ सह्याद्रीचा सहवास ‘ या नावाने विविध उपक्रम राबवत असुन इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी गिर्य़ारोहण मोहीमेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे चौथे वर्षे असुन या वर्षी बिरवाडी ते सप्त शिवालय घोणसपूर ते मधु मकरंदगड यांच्या १७ किल्ल्यांपैकी एक ते कुडपान {पोलादपुर – रायगड } भीमाची काठी ते वडगाव बुद्रुक असे गिर्यारोहण मोहीमेचे स्वरुप आहे.
या मोहीमेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑक्टोबरपरर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहीतीसाठी विकास मोरे ९८२१८९४१४३ ,निलेश मोरे ९९२०३६६८१० येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.