वाकरे / प्रतिनिधी
कुडीत्रे, ता. करवीर येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाडी, ट्रक यांना रात्रीचे अपघात होऊ नयेत म्हणून व लांबून उसाचे वाहन दिसण्यासाठी रिफ्लेक्टर लावण्यात आले. कोपार्डेचे माजी उपसरपंच व्ही.जी.पाटील यांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहन अधिकारी सौ.स्नेहा गिरी यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनचालकांना वाहतुकीचे नियम व रिफ्लेक्टर लावण्याचे फायदे सांगून अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला ट्रॅफिक पोलीस हवालदार विठ्ठलराव जरग व त्यांचा स्टाफ, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील,शेती अधिकारी सुरेश साळवी, ऊस विकास अधिकारी टी.के पोवार,सिव्हिल इंजिनिअर सरदार पाटील, केनयार्ड सुपरवायझर महेश वातकर, सदाशिव देसाई, मेजर रंगराव पाटील, कृष्णात बुचडे ऊपस्थित होते. ट्रॅक्टर ड्रायव्हर यांची मनोगते व्यक्त केली.