वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही, परिणामी कुंभोज ग्रामस्थांचा असणारी 50 वर्षांपासूनची कुंभोज वाठार रस्त्याची मागणी आपण निवडणुकीत दिलेल्या वचनाप्रमाणे पूर्ण करत असून, कुंभोज ग्रामस्थांना निवडणुकीत जी आश्वासने दिली त्या कामांना सुरुवात झाली असून यासाठी कोणत्याही पद्धतीचा निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. असे गौरवोद्गार आमदार राजू बाबा आवळे यांनी काढले.
ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे शिवाजीनगर, ग्रामपंचायत कुंभोज, पोतदार गल्ली, वाठार कुंभोज रोड, आदी ठिकाणच्या रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले होते. यावेळी गेल्या पन्नास वर्षांपासून कुंभोज ग्रामस्थांना भेडसावत असणाऱ्या कुंभोज वाठार रस्त्याचा प्रश्न हा गेले अनेक वर्षे ऐरणीवर आला होता. परिणामी यावेळी 25 /15 या योजनेतून सदर रस्त्यासाठी आपण 25 लाखाचा निधी मंजूर केला असून सदर कामाला येत्या आठ दिवसात सुरुवात होत केली जाईल व अनेक शेतकऱ्यांचा असणारा रस्त्याचा प्रश्न निकाली निघेल त्याच पद्धतीने सदर कामाच्या सर्वच ठकेदारांनी चांगल्या पद्धतीचे काम करावे परिणामी नागरिकातून कोणतीही तक्रार देऊ नये अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला.
परिणामी यावेळी कुंभोज ग्रामपंचायतीचेवतीने सरपंच, प्रशासक व ग्रामसेवक यांच्या वतीने आमदार राजु आवळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.