वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता. हातकणंगले येथे कुंभोज रोडवर काही नागरिकांना बिबट्या सदृश प्राण्यांचे दर्शन झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. परिणामी याबाबत वन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणावरील पायाचे ठसे तपासले असता तो बिबट्या किंवा तरस नसून रानबोका असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच परिसरातील नागरिकांना भीतीचे कोणतेही कारण नसल्याचाही खुलासा केला परंतु कुंभोज नागरिकांच्या मनात अध्याप बिबट्या विषयी भीतीचे वातावरण पसरले असून मागील तीन वर्षाचा इतिहास पाहता. बिबट्याने दानोळी कुंभोज परिसरात थैमान घातले होते. रात्रीच्या वेळी शेतकरी वर्ग शेतीसाठी पाणी पाजणेसाठी शेतात जाण्यास तयार नाही. तसेच महिलावर्ग दिवसभर सदर परिसरात कामासाठी यायला तयार नाही. अशी परिस्थिती तयार झाली आहे.
याबाबत वनविभागाकडून रात्रीची गस्त घालण्यात येत असून वेगवेगळ्या ठिकाणी अन्य काही सुगावे लागतात का याचा खुलासा करण्यात येत आहे. परिणामी कुंभोज ग्रामस्थांनी कोणत्याही भीती बाळगू नये असे आव्हान वन विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.