कुंभोज / वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले येथे आज आंबेडकर चौकात असणाऱ्या वसंत वाघमारे पाटील यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी पहाटे साडेपाच वाजता घरात कोण नसल्याचे पाहून घरातील दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला व तिजोरीत असणारे अर्धा तोळे सोने चांदी व रोख बार हजार रुपये रक्कम हातोहात लंपास केली. पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या चोरीमुळे कुंभोज ग्रामस्थ आपण भीतीचे वातावरण पसरले असून याची नोंद हातकडी पोलिसात करण्यात आली आहे.