वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे काँग्रेस , राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, ताराराणी आघाडी प्रणित कुंभोज महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर येथे करण्यात आला. प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर सहकारी साखर कारखान्याचेउपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले होते.
यावेळी विविध प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ हनुमान मंदिरातून करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील विविध मंदिराचे दर्शन घेण्यात आले. यावेळी पॅनेल प्रमुख किरण माळी ,बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, डॉ. सत्यजित तोरस्कर , सुरेश गायकवाड, सुदर्शन चौगुले,आदींसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुखांनी केले.
तसेच जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजप, जय शिवराय किसान संघटना, आरपीआय प्रणित लोकविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ ग्रामदैवत कुंभेश्वर महादेव मंदिर व स्वामी समर्थ मंदिर येथे करण्यात आला. प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे संचालक अरूण पाटील होते. यावेळी विविध प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत कुंभेश्वर महादेव मंदिर व स्वामी समर्थ मंदिरातून करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील विविध मंदिराचे दर्शन घेण्यात आले. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरूण पाटील, समीर भोकरे, विनायक पोतदार, दत्ता मिसाळ, सचिन शिंदे, बलुपंत कुलकर्णी, नाभिराज भोकरे , संभाजी मिसाळ, अमोल गावडे, विजय नामे ,प्रमोद चौगुले, श्रीपती कोळी, कुमार पाटील, रफिक मुल्ला ,साहील मुल्ला ,बाळासाहेब भोकरे , भानुदास माळी, विश्वजीत माने ,संभाजी मानेंसह महिला मोठ्य़ा संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी लोकविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान लोकविकास आघाडीचे पॅनेल प्रमुखांनी केले. तसेच अपक्ष असणाऱ्या जनविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ हजरत शहा खत्ताल हुसेन दर्गाह येथे करण्यात आला. प्रचार शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी ( शिंदे ) हे होते. यावेळी प्रभाग क्रमांक एक व सहा मधील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ दर्गाह येथे करण्यात आला.
यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील विविध मंदिराचे दर्शन घेण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी आदींसह महिला मोठ्य़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जनविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान जनविकास आघाडीचे पॅनेल प्रमुखांनी केले.