दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची घेतली दखल
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता हातकणंगले येथे बाहुबली कुंभोज रोड दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सध्या नर वानरानी थैमान घातले होते. त्याबाबत दैनिक तरुण भारतने वारंवार वानरांच्या बंदोबस्त करण्याचे बातमी प्रसारित केली होती. सदर बातमीची दखल घेऊन आज ग्रामपंचायत कुंभोज यांनी सह्याद्री रेसकु फोस करनूर व वन अधिकारी यांच्या माध्यमातून शिवाजीनगर परिसरात जाळी रचून सदर वानराला पकडण्यात यश मिळवले.
सदर वानरामुळे गेल्या दोन महिन्यापासून शिवाजीनगरात मोठ्या प्रमाणात महिलांचा घबराट निर्माण झाली होती ,सदर वानरांचा बंदोबस्त करणे बाबत कुंभोज येथे झालेल्या खास ग्रामसभेत पत्रकार विनोद शिंगे यांनी वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. सदर मागणी लक्षात घेता ग्रामपंचायत कुंभोज यांनी तात्काळ करनूर येथील सह्याद्री रेसक्यु फोर्सला आमंत्रित करून सदर वानराला पकडून शिवाजीनगर परिसरातील महिलांच्या मोठी समस्या सोडवण्यात यश मिळवले आहे .याबाबत कुंभोज ग्रामपंचायत व सह्याद्री रेसक्यु फोस यांचे ग्रामस्थांतून कौतुक व्यक्त होत असून सदर वानरांना पकडून रात्री उशिरा जंगलात सोडण्यात आले असून सदर वानराच्या वारंवार होणाऱ्या महिलांच्या वरील हल्ला व महिलांना होणारी मारहाण यामुळे कुंभोज परिसरातील महिलांच्या भीतीचे वातावरण पसरले होते.
कुंभोज बाहुबली रोड दरम्यान मोठ्या प्रमाणात दररोज सकाळ संध्याकाळी महिलांचा व्यायाम साठी तसेच मुलींचा बाहुबली विद्यापीठात शिक्षणासाठी मोठा वावर असतो सदर वानर महिलांचा पाठलाग करणे महिलांच्या वर हात उगारणे, तसेच लाल कलर च्या कोणत्याही वाहनावर सदर वानर धावत जाऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाला मारहाण करत होते, सदर माकडाच्या नाहक त्रासामुळे छत्रपती शिवाजी महाराज नगरातील महिलाचात भीतीचे वातावरण पसरले होते ,सदर दोन वानरांचा बंदोबस्त ग्रामपंचायत कुंभोज यांनी करावा व महिलांचे संरक्षण करावे अशी मागणी महिलांच्या तुन मोठ्या प्रमाणात होत होती व महिलांच्या मागणीला आज प्रत्यक्ष यश मिळाले नाहक त्रास देणारे वानर आज जेरबंद झाले