वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता हातकणंगले येथे बाहुबली कुंभोज रोड दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सध्या दोन नर माकडांनी थैमान घातले असून या माकडांच्या वारंवार होणाऱ्या महिलांवरील हल्ला व महिलांना होणारी मारहाण यामुळे कुंभोज परिसरातील महिलांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुंभोज बाहुबली रोड दरम्यान मोठ्या प्रमाणात दररोज सकाळ संध्याकाळी महिला व्यायामसाठी तसेच मुलींचा बहुबली विद्यापीठात शिक्षणासाठी मोठा वावर असतो परिणामी सदर माकड महिलांचा पाठलाग करणे, महिलांच्या वर हात उगारणे, तसेच लाल कलरच्या कोणत्याही वाहनावर माकड धावत जाऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाला मारहाण करतात, या माकडाच्या नाहक त्रासामुळे छत्रपती शिवाजी महाराज नगरातील महिलाचात भीतीचे वातावरण पसरले असून, दोन माकडांचा बंदोबस्त ग्रामपंचायत कुंभोज यांनी करावा व महिलांचे संरक्षण करावे अशी मागणी महिलांच्या तुन मोठ्या प्रमाणात होत आहे.
परिणामी गेल्या वर्षभरापासून दोन्ही माकड छत्रपती शिवाजीमहाराज नगरात वास्तवात असून त्यांनी बराच वेळा घरात बसून महिलांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे ,परिणामी यामध्ये काही महिलाही मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत,याबाबत वारंवार ग्रामपंचायतला सूचना करूनही अद्याप ग्रामपंचायत कुंभोज यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. माकडांचा त्रासदायक उपद्रव पाहता सदर वानराचा बंदोबस्त न केल्यास काही तरी विपरीत घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे परिणामी सदर वानरामुळे जखमी झालेल्या महिलांनी वन विभागात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरीही वन विभागाचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे .