म्हापसा प्रतिनिधी : कुचेली येथील पारंपरिक फुटबॉल मैदानाचे संरक्षण करण्याकरिता लोकशाही मार्गाचा अवलंब करीत कुचेली मैदान बचाव समिती कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यास सज्ज आहे. या कारणांसाठीच मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांनी म्हापशातील उप-जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत समितीद्वारा एक निवेदन सादर करण्यात आल्याचे उत्तर गोवा कॉग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी म्हापशात सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय बर्डे, शिवसेनेचे राज्य प्रमुख जितेश कामत, म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर कांदोळकर, शेखर बेनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण आसोलकर, वाळपई तालुका कॉग्रेसचे गटाध्यक्ष दशरथ मांदेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी भाजप हा बहुजन विरोधी पक्ष असल्याचे सांगितले. जनतेला सुशासन देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपने आतापर्यंत बहुजन समाजाच्या विरोधात काम करीत हा पक्ष मुठभर उच्च वर्णींयांचा असल्याचे दाखवुन दिले आहे असे बर्डे म्हणाले. कुचेली मैदानाचा सफाया करण्यासाठी स्थानिक नगरपालिका मंडळ तसेच सरकारी यंत्रणा तालमोलाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन ओडीपी घोषीत करून बार्देश तसेच तिसवाडीतील स्थानिक शेतकर्यांचा हक्क हिरावून घेण्याचा भाजपकडून सध्या कुटील डाव रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कुचेलीतील दोन्ही? मैदानांचे रक्षण करण्याकरिता शिवसेना स्थानिक जनतेच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचे राज्य प्रमुख जितेश कामत यांनी यावेळी सांगितले. येथील मैदानांच्या सभोवताली व्यतिरिक्त ठरणाऱया जमीनीत मध्यम वर्गीय लोकांसाठी निवासी घरे बांधण्याची त्यांनी मागणी केली. मात्र, स्थानिक कोमुनिदादने धनाढ्य लोकांचे हीत समोर ठेवून याभागात फुटबॉल मैदानाच्या जागी बंगले उभारण्याचा आखलेला बेत शिवसेना उधळून लावणार असल्याचा कामत यांनी इशारा दिला. यावेळी वाळपई कॉग्रेसचे दशरथ मांदेकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, शेखर बेनकर तसेच बार्देशातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण आसोलकर यांची कुचेली मैदान समिती च्या समर्थनार्थ भाषणे झाली.
Trending
- नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी भाजपमध्ये; आमदार सतेज पाटील गटाला धक्का
- आरोप, प्रत्यारोप नको, शाश्वत विकासावर बोला ! जाणकार मतदारांचे उमेदवारांसह नेत्यांना आवाहन
- विद्यापीठ अंतर्गत 26, 27 एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
- जोतिबाच्या सेवेत गुरव समाजाची सात कुटुंबे! जोतिबा रोडवरील जोतिर्लिंग मंदिरातील परंपरा
- प्रश्नच प्रश्न चोहीकडे…गेला खासदार कुणीकडे..? मुकुंदराव देसाई यांचा सवाल
- भूलथापांना विटलेली जनता भाजप सरकारचा कडेलोट करणार : डॉ. नंदाताई बाभूळकर
- रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!
- मंडलिकांनी विकासकामे मार्गी लावलीत; चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन