ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. अलिकडेच त्यांनी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेमुळे त्यांना काही नेटकऱयांनी ट्रोल देखील केले.
या नेटकऱयांवर अनुपम खेर यांनी ट्विट करत संताप व्यक्त करताना म्हणाले, मला पाडवण्याचा प्रयत्न करणारे स्वतःच पडतात.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘ना मी पडलो ना माझ्या अपेक्षा, परंतु मला पाडण्याचा प्रयत्न करणारे लोक मात्र नक्कीच पडले. अशा आशयाचे ट्विट करुन अनुपम खेर यांनी ट्रोलकऱयांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.