ऑनलाईन टीम / नागपूर :
कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरच्या पाचपावली भागात रविवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, नागपुरच्या पाचपावली भागात राहणाऱ्या अलोक माथुरकर याने रविवारी रात्री आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची हत्या केली. त्यानंतर जवळच राहणाऱ्या सासू आणि मेहुणीची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.