प्रतिनिधी/ बेळगाव
बैठी जीवनशैली तसेच ताण-तणावामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्या दूर करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. कुठल्याही वयात आपण व्यायामला सुरुवात करू शकतो. मात्र यासाठी तासभर तरी वेळ काढला पाहिजेत. व्यायामामुळे जीवनात आनंद मिळतो. चालणे, योगा आणि इतर व्यायाम सध्याच्या युगात आवश्यक आहे, असे विचार मॅरेथॉनपटू मिनल लेले यांनी व्यक्त केले.
आदर्श महिला मंडळाचा वर्धापन दिन गुरुवारी खानापूर रोड येथील न्यू उदय भवनमध्ये साजरा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षा स्मिता शंकरगौडा, गीता कित्तूर, गायत्री माहिरे उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
मिनल लेले म्हणाल्या, पहिल्यांदा अमेरिकेत मॅरेथॉनची पेझ निर्माण झाली आणि त्यानंतर देशात मॅरेथॉन सुरू झाली. नियमानुसार मॅरेथॉन 42 किलोमीटरची असते. मात्र आपल्या कुवतीप्रमाणे धावत रहा, असा सल्लादेखील त्यांनी दिला. सायकलिंग आणि गडकिल्ल्यांवरील टेकिंगमुळेदेखील व्यायाम होतो. यासाठी सायकलिंग आणि टेकिंगचीही आवड निर्माण करा, असे सांगत आपले अनुभव त्यांनी कथन केले.
अध्यक्षा स्मिता शंकरगौडा यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार गीता कित्तूर यांनी परिचय करून दिला. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन गायत्री माहिरे यांनी केले.