प्रतिनिधी / कुडचडे
‘कोव्हिड-19’ संदर्भात सरकारतर्फे ठरविण्यात आल्याप्रमाणे सामाजिक सर्वेक्षण सोमवारपासून सुरू झाले असून कुडचडे येथेही या सर्वेक्षणास लोकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. कुडचडेतील सर्वोदय हायस्कूल परिसर, कुडचडे पोलीस क्वॉर्टर्स येथे सर्वेक्षण झालेले आहे व कुडचडे बाजार परिसरात सुरू आहे. एकूण 50 टक्के परिसरात सर्वेक्षण झाले असून सकाळी 9 वा. सर्वेक्षण सुरू केले होते तसेच उर्वरित भाग दिलेल्या वेळेत पूर्ण होईल. सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक कुटुंबाने पूर्ण सहकार्य केलेले आहे. असेच सहकार्य सर्वत्र केले, तर हे काम चांगल्याप्रकारे व दिलेल्या वेळेत पूर्ण होणार, अशी माहिती भाग क्र. 30 चे बीएलओ सुभाषचंद्र नाईक यांनी दिली. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षिका सीमा काणेकर, सीमा देसाई व बाबुराव देसाई हे सहकार्य करत आहेत, असे असे नाईक यांनी सांगितले.