आणखी तिघे पॉझिटिव्ह : शहर संपूर्ण सीलडाऊन : जिल्हा-तालुका प्रशासन सतर्क : राज्यात बेळगाव तिसऱया क्रमांकावर
वार्ताहर/ कुडची
कुडचीत रविवारी तिघा रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असतानाच सोमवारीही आणखी तिघे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे कुडचीत हाहाकार उडाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनानेही याची गंभीर दखल घेताना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी कंबर कसली आहे. येथील रुग्ण संख्या 10 तर जिल्हय़ातील आकडा 17 वर पोहचला आहे. यामुळे कुडची जिल्हय़ातील कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट ठरले आहे.
सोमवारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. कुडची येथील 67 वषीय वृद्धेच्या संपर्कातून 14 वर्षाचा मुलगा, 20 वषीय तरुण व 45 वषीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वृद्धा 13 ते 18 मार्चपर्यंत नवी दिल्ली येथे झालेल्या तबलिग जमातच्या धर्मसभेत सहभागी झाली होती.
या तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्वॅब तपासणी अहवालावरून स्पष्ट होताच रविवारी रात्री उशिरा त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ज्या 67 वर्षीय महिलेच्या संपर्कातून या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे ती महिला 20 मार्च रोजी नवी दिल्ली येथून आपल्या गावी परतली होती.
दरम्यान, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी सोमवारी सायंकाळी हेल्थ बुलेटिन प्रसिद्ध केले असून बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्त सर्व 17 जणांवर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी या बुलेटिनमध्ये दिली आहे. सोमवारी दिवसभरात राज्यातील 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामधील बेळगाव जिल्हय़ातील तिघा जणांचा समावेश आहे.
बेंगळूर शहर, म्हैसूर नंतर तिसऱया क्रमांकावर बेळगाव येऊन पोहोचले आहे. बेंगळूर शहरात कोरोनाचे 77 रुग्ण तर म्हैसूरमध्ये 48 रुग्ण आढळून आले आहेत. 17 रुग्णसंख्या असणारे बेळगाव राज्यात तिसऱया क्रमांकावर असून यामुळे कोरोनाची भीती वाढतच चालली आहे.
रविवार दि. 5 रोजी मरकजहून परतलेल्या चौघांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर कुडचीसह तीन किलोमीटरचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. काही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. पोलीस प्रशासनानेही सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवताना अंमलबजावणी सुरू ठेवली होती. मात्र रविवारी 12 रोजी क्वारंटाईन केलेल्या 3 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर सदर तिघांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. असे असताना आणखी तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. यामुळे दोनच दिवसात कुडचीतून सहा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कुडचीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने खबरदारी घेताना सीलडाऊन कडक केले आहे. यामुळे येथील मुख्य मार्गावर सन्नाटा पसरला आहे. याबरोबरच अधिकारी वर्गाची झोपमोड झाली आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर अधिकारी वर्गाने कुडचीत तळ ठोकताना खबरदारी घेण्यात येत आहे. कुडचीत तहसीलदार, अथणीचे डीएसपी, तालुका वैद्याधिकारी, कुडचीचे वैद्याधिकारी, नगर परिषद कर्मचारी, स्थानिक पोलीस कर्मचारी आपापल्या पातळीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
क्वारंटाईनची संख्या वाढणार
गत दोन दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 6 ने वाढ झाली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पहिल्यांदा आढळलेल्या चार रुग्णांच्या कुटुंबीयांसह 46 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे सदर क्वारंटाईन केलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन करून तपासणी करण्यात येणार असल्याने क्वारंटाईनचा आकडा वाढणार आहे. दरम्यान सोमवारी जवळपास कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यापैकी काहीजणांना खबरदारी म्हणून अन्यत्र क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दोन दिवसात सहा रुग्ण पॉझिटिव्ह
5 एप्रिल रोजी कुडचीत चौघे कोरोनाबाधित आढळले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह 46 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील तिघांना रविवार 12 रोजी तर सोमवार 13 रोजी आणखी तिघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गत दोन दिवसात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
दहा दिवसात सतरा रुग्ण
बेळगाव जिल्हय़ात दहा दिवसात कोरोनाचे 17 रुग्ण आढळून आले आहेत. 3 एप्रिल रोजी बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीणमधील बेळगुंदी, हिरेबागेवाडी येथील तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा पहिला अहवाल आला. 13 एप्रिल रोजी दहाव्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अहवालात रायबाग तालुक्मयातील कुडचीतील तिघा जणांचा समावेश आहे. दहा दिवसात चार महिलांसह एकूण 17 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.