बेळगाव / प्रतिनिधी
कुडची (ता. रायबाग) येथील आणखी तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी दुपारी आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 17 वर पोहचली आहे. यामध्ये 14 वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
गेल्या महिन्यात नवी दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या धर्मसभेत कुडची येथील 67 वषीय वृध्दा भाग घेतली होती. तीच्या संपर्कामुळे तीच्याच कुटुंबातील 20 वर्षीय तरूण, 14 वषीय मुलगा व 45 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या तिघा जणांना रविवारी रात्री उशीरा सिक्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या विभागात सध्या 17 कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. एका कुडचीतील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.