प्रतिनिधी/ ेळगाव :
कुडची, ता. रायबाग येथील दोन महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत. दोन वेळा स्वॅब तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सरकारच्या मार्गसूचीनुसार गुरुवारी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले.
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी ही माहिती दिली. जिल्हय़ातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. बुधवारी कुडची येथील एका 25 वषीय तरुणाची सिव्हिल हॉस्पिटलमधून सुटका करण्यात आली होती. दुसऱया दिवशी दोन महिलांना घरी जाऊ देण्यात आले आहे.
बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी व कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून या दोन्ही महिलांना निरोप दिला. 67 वषीय रुग्ण क्रमांक 149 व 36 वषीय रुग्ण क्रमांक 147 या दोन महिलांना विशेष वाहनातून घरी पाठविण्यात आले. घरी गेल्यानंतरही चौदा दिवस सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
31 मार्च व 1 एप्रिल रोजी या महिलांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नवी दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमधील धर्मसभेत भाग घेऊन गावी परतलेल्या नातेवाईकांपासून या महिलांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारांती त्या पूर्णपणे बऱया झाल्या आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले. आतापर्यंत जिल्हय़ातील 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दहा जण पूर्णपणे बरे झाले आहेत तर एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे.