प्रतिनिधी / बेळगाव
मिरज ते लोंढा या दरम्यानच्या 186 कि. मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. यातील एक टप्पा असणाऱया कुडची ते रायबाग या 17 कि. मी. लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी केली. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) ए. के. राय यांनी या कामाची पाहणी केली.
2015-16 मध्ये लोंढा ते मिरज या मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली. एकूण 3,627.47 कोटी रुपये खर्चून दुपदरीकरण केले जाणार आहे. यातील एक भाग असणाऱया कुडची-रायबाग या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाची पाहणी अधिकारीवर्गाने केली. या 17 कि. मी. च्या मार्गामध्ये 2 मोठे ब्रिज, 20 लहान ब्रिज, 22 वॉटर वे ब्रिज, 4 रोड अंडर ब्रिज व 1 कॅनॉल ब्रिजची निर्मिती करण्यात आली आहे.
दुपदरीकरणाच्या प्रकल्पातील हा तिसरा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घटप्रभा ते चिकोडी रोड हा 16 कि. मी. लांबीचा मार्ग, दुसऱया टप्प्यात चिकोडी रोड ते रायबाग हा 14 कि.मी. लांबीचा मार्ग असे दोन टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. हा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यामुळे रेल्वेचा प्रवास गतिमान होणार आहे.