प्रतिनिधी/ पणजी
पेठवाडा-कुडणे सांखळी येथील श्री महालक्ष्मी कलश बैठक मंदिराच्या कार्यकारीणी समिती अध्य़क्षपदी राजेंद्र नागेश मायणीकर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी कमलाकांत सुर्धा मायणीकर यांची निवड झाली.
2019 ते 2022 पर्यंतच्या कालावधीसाठी ही समिती निवडण्यात आली आहे. दिलीप पेठकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. समितीवरील अन्य पदाधिकाऱयामध्ये सचिव आनंद रघुवीर पेठकर, सहसचिव विष्णू शंभा ढवळे, खजिनदार विष्णू सावळो मायणीकर, सहखजीनदार उदय लक्ष्मण नाईक, सभासद जयदेव नागेश मायणीकर, दिलीप विठ्ठल पेठकर, निलेश बाबलो पेठकर यांचा समावेश आहे. तर सल्लागारपदी प्रा. सदानंद पांडुरंग पेठकर यांची निवड करण्यात आली आहे.