वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ तालुक्मयातील भाजप पदाधिकाऱयांनी दिल्ली येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच नीलम राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, कुडाळ सभापती नूतन आईर, तालुकाध्यक्ष दादा साईल, युवामोर्चा ओरोस मंडळ अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे व कुडाळ मंडळ अध्यक्ष रुपेश कानडे, तालुका सरचिटणीस देवेंद्र सामंत, कुडाळचे माजी नगरसेवक सुनील बांदेकर, साळगाव सरपंच उमेश धुरी, रांगणातुळसुली सरपंच नागेश आईर, बाव सरपंच नागेश परब आदींनी भेट घेतली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून निवड झाली. हा क्षण केवळ सिंधुदुर्गच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कालावधी कमी असला, तरी त्यांचा दूरगामी दृ†िष्टकोन आणि राजकीय अनुभव यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अतिशय चांगली कामगिरी करून देशाला व उद्योजकांना नक्कीच न्याय देतील. कोकण आणि महाराष्ट्र राज्यातील मत्स्य, फळप्रक्रिया, पर्यटन, खादी आणि ग्रामोद्योग तसेच इतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग करणाऱया उद्योजकांना या खात्याच्या माध्यमातून आणखी चांगल्या संधी येणाऱया काळात उपलब्ध होणार आहेत. मोदी यांच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर अभियानाला यामुळे खऱयाअर्थाने गती प्राप्त होईल, असा विश्वास सौ. तेरसे व अन्य पदाधिकाऱयांनी व्यक्त केला.