मृत्यूची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
दापोली/प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यु आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी आमदार योगेश कदम यांच्याकडे केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणांची धावाधाव सुरू आहे. सदर घटना आज शुक्रवारी घडली.
याबाबत अधिक माहिती देताना सदर महिलेला देण्यात आलेले तपासणीचे आकडे इंग्रजीमध्ये व त्यावर इंग्रजी तारखा होत्या. त्या आदिवासी लोकांना वाचता आल्या नाहीत. यामुळे तारखेमध्ये घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. किमान आदिवासी व अल्पशिक्षित लोकांच्या आरोग्याची आकडे तरी किमान मराठीमध्ये असावेत अशी मागणी ग्रामस्थ महेश कदम यांनी तरुण भारतशी बोलताना केली आहे.