जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे शहरातील जनता भयभीत झाली आहे. शहरात जवळपास 20 हजारांहून अधिक मोकाट कुत्री फिरत आहेत. ही कुत्री अचानक हल्ला करत आहेत. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करणे काळाची गरज आहे. त्यासाठी नसबंदीसह इतर उपाययोजना तातडीने राबवा, अन्यथा रास्तारोको करू, असा इशारा देण्यात आला. काकतीवेस परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आरोग्याधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे.
काकतीवेस येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वषीय बालिका गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अशाप्रकारे अनेकवेळा कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. अन्यथा या रस्त्यावरून कोणालाही फिरता येणार नाही, हे देखील लक्षात घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये शहरच नाही तर उपनगरांमध्येही हल्ल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारखूट, खंजर गल्ली, गणाचारी गल्ली, नार्वेकर गल्ली, रिसालदार गल्ली, भडकल गल्ली, चांदू गल्ली, चिराग गल्ली, काकतीवेस या परिसरात जवळपास 10 ते 15 कुत्र्यांचा कळप फिरताना दिसत आहेत. हे कळप अचानक हल्ला करत आहेत. इतक्मया मोठय़ा प्रमाणात कुत्री असल्यामुळे त्याला प्रतिकार करणेदेखील अशक्मय झाले आहे.
काकतीवेस येथे जखमी झालेल्या बालिकेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बालिकेचे आई-वडील अत्यंत गरीब आहेत. काही दिवसांपासून ते काकतीवेस येथे भाडोत्री राहत आहेत. हॉटेलमध्ये काम करून हे कुटुंब जीवन जगत आहे. वडील घरात नसल्याने आईने पाच वर्षे मुलीला दूध आणण्यासाठी बाहेर पाठविले. त्यावेळी अचानकपणे कुत्र्यांनी हा हल्ला केला आहे.
यापूर्वीही अनेक लहान मुलांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तेंव्हा तातडीने शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. जर या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर लवकरच शनिवारखूट येथे रास्तारोको करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना आणि महापालिकेचे आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश अशोक काळे, रघुवीर अरकेरी, रोहन घोडके, ऍड. सुरेश माने, अनिल पासलकर यांच्यासह या परिसरातील नागरिक उपस्थित होते.