बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटकात अनेक बैलगाडी शर्यतीत धुमाकूळ घालणाऱया कुदनूर (ता. चंदगड) येथील शंकर दत्तु आंबेवाडकर (मेस्त्री) यांच्या हरण्या या बैलाचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे चंदगड तालुक्मयातील बैलगाडी शर्यती शौकिनांतून हळहळ व्यक्त होत आहे.
कुदनूर येथील माजी जि. पं. सदस्य शंकर आंबेवाडकर (मेस्त्री) हे बैलगाडी शर्यतीचे शौकीन असून गेल्या 40 वर्षांपासून आंबेवाडकर कुटुंबियांचा हा बैल कर्नाटक व महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी भाग घेत पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवित असे. या बैलाने दोन महिन्यापूर्वी दड्डी येथे झालेल्या भव्य शर्यतीत दुसरा क्रमांक, खानापूर तालुक्मयातील बेकवाड येथे विक्रम नोंदवित पहिला क्रमांक, बिडीमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला होता. आंबेवाडकर परिवाराने रिऍक्शन झालेल्या हरण्याला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी सकाळी हरण्याने शेवटचा श्वास घेतला. ही वार्ता समजताच कुदनूर परिसरातील शेतकऱयांनी हरण्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. या नावाजलेल्या हरण्याची अंत्ययात्रा काढून त्याचे दफन करण्यात आले.