वार्ताहर /कुद्रेमनी
कुदेमनी-सोनोली संपर्क रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीकामाचा शुभारंभ नुकताच झाला. ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून तीन लाख रुपये विकासकामासाठी मंजूर झाले असून सदर निधीतून विकासकामे राबविण्यात येण्याची माहिती देण्यात आली.
कुदेमनी ग्रा. पं. माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, ग्रा. पं. सदस्य अरुण देवण यांच्या हस्ते खड्डय़ांमध्ये काँक्रीट टाकून कार्याची सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी संजय राजगोळकर, रुक्माण्णा कागणकर, दत्तू पाटील, प्रकाश यळ्ळूरकर, गोविंद कांबळे, शिवाजी कांबळे, मनोहर गोवेकर, जानबा कांबळे यांच्या हस्ते पूजन झाले.
पावसाळय़ात या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे रहदारी धोक्मयाची झाली आहे. कुदेमनी गावच्या सरदार नाल्यापासून ते सोनोली गावच्या मार्कंडेय नदीपर्यंत दोन अडीच किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. सोनोली-बेळगुंदी, यळेबैल, शिनोळी, सुरुते आदी भागातून ऊस वाहतूक करणारे ट्रक्टर, दुचाकी, दूध टेम्पोंची वाहतूक याच रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात होत असते.
रस्त्याची तातडीने दुरुस्तीची गरज
सध्या या भागात भात कापणी व मळणीची कामे सुरू झाली आहेत. रताळी वाहतूकही होत आहे. नेहमी शेतकऱयांच्या बैलगाडय़ा, सायकली यांची या रस्त्याने रहदारी रात्रंदिवस सुरू असते. वेगवेगळय़ा कारखान्यांच्या ऊस तोडणी करणाऱया टोळय़ा या भागात सक्रिय झाल्या आहेत. उसाची वाहतूक या मार्गाने सुरू झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज निर्माण झाली होती. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.