कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील लिंगायत गल्ली येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरूणीने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये सनम सत्तार पठाण (१७) असे मयत तरुणीचे नाव असून याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सनम सत्तार पठाण ही मुलगी गेल्या काही महिन्यापासून कुपवाडमध्ये मामाच्या घरी राहत होती. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तीने गळफास लावून घेऊन घेतल्याचे उघडकीस आले. या घटनेची फिर्याद मुलीचे मामा राजु फकीर यांनी दिली आहे. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.