९० हजारांचा मुद्देमाल लंपास, महिलेविरोधात गुन्हा
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील अकुज ड्रिमलॅण्डच्या पार्किंग झोनमध्ये उभी केलेल्या कारची मागील बाजुची काच फोडून अज्ञातांनी मागच्या सीटवर ठेवलेली बॅग पळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड मिळून ९० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तानाजी शिवाजी पवार रा.अकुज ड्रिमलॅण्ड, कुपवाड यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी तानाजी पवार यांच्या कारची काच फोडून बॅगेतील ८५ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार मिळून ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.