कुपवाड / प्रतिनिधी
सावर्डेची घटना ताजी असतानाच कुपवाडमध्ये दोघेही विवाहित असलेल्या एका प्रेमीयुगलाने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. दोघांनीही पहिल्यांदा विषप्राशन करून एकाच साडीने पत्र्याच्या शेडमध्ये छताला गळफास घेतला आहे. या घटनेची कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
यामध्ये राजू महादेव माळी वय ३६,रा.खोत मळा,कुपवाड. मूळ बसवेश्वर,जि. विजापूर व रीना किरण पार्लेकर वय ३३,रा.वखारभाग, रामलिंग कॉलनी,मिरज अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. ते दोघेही कुपवाड एमआयडीसीतील एका गारमेंटमध्ये कामाला होते. मयत राजू माळी हा बसचालक म्हणून तर रीना पार्लेकर ही कामगार म्हणून होती. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या का केली? याबाबत नेमके काऱण अद्याप स्पष्ट झाले नाही.।कुपवाड ते बुधगाव रस्त्यालगत एका शेतकऱ्याच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.