ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नादेरनाग अवूरा येथे एका मोठ्या दगडाखाली लपवलेले 4 आयईडी बॉम्ब सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला. ते बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक बोलावण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी या भागाला वेढा दिला असून, शोधमोहीम राबविली जात आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे पोलीस आणि लष्कराच्या 41 आरआर या पथकाने नादेरनाग अवूरा भागात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, एका मोठया गडाखाली 4 आयईडी बॉम्ब आढळून आले. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक बोलावण्यात आले आहे. तसेच या परिसराला वेढा देऊन दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.