कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील गावभागात महापालिका कार्यालयासमोर एकाठिकाणी गुरुवारी मध्यरात्री घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली असून यामध्ये चोरट्यांनी ३९ हजाराच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोसांत नोंद झाली आहे.
येथील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पैगंबर जमाल मुलाणी यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील ३९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचे फिर्यादित म्हंटले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.