प्रतिनिधी/ मडगाव
अनेक गुन्ह्यांत अडकलेला मडगावातील कुप्रसिद्ध गुंड अन्वर शेख याला बुधवारी पोलिसांच्या एका पथकाने खांडोळा परिसरात अटक केले. या आरोपीला पकडण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली होती.
दक्षिण गोव्याचे पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली. मायणा कुतडरी पोलीस स्थानकाच्याहृद्दीत येत असलेल्या रामनगर जंक्शनजवळ एक घटना घडली होती. मुरिडा फातोर्डा येथील रायन नावाचा एका युवक आपल्या दुचाकीवरुन येत होता. आरोपी अन्वर शेख बाजुला दबा धरुन दुचाकीवर होता. समोरुन येत असलेलया युवकाला पाहताच अकस्मात आरोपी अन्वर शेख याने आपली पल्सर दुचाकी रत्यावर मध्ये उभी केली.
अकस्मात झालेल्या या प्रकाराने रायन गडबडला आणि त्याने आपली दुचकी रस्त्याच्या मध्ये पार्क केलेल्या दुचाकीसमारे उभी केली. रायन याने दुचाकी उभी करताच आरोपीने अन्वर याने त्याला अर्वाच्च शिव्या देण्यास सुरुवात केली. अकस्मात झालेल्या या प्रकाराने काय होत आहे हे रायन याच्या लक्षात येईना. आणखी काही समजायच्या आत आरोपी अन्वर याने रायन येंच्या नाकावर जोरदार ठोसा लगावला. हा ठोसा इतका जबरदस्ता होता की रायन याच्या नाकातून रक्ताच्या धारा सुरु झाल्या.
त्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. गंभीररित्या जखमी झालेल्या रायन याला कोणीतरी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. तेथे डय़ुटीवर असलेल्या पोलिसाने ही घटना मायणा कुतडरी पोलिसांच्या कानी घतली. त्यानंतर ही बाब पोलस अधीक्षकांच्या कानी गेली. पोलीस तपासात या प्रकरणातील आरोपी हा बोर्डा मडगाव येथील हजरत अली शेख उर्फ अन्वर शेख उर्फ टायगर अन्वर (29) असल्याचे दिसून आले. या आरोपीला पकडण्याची तयारी सुरु झाली.
पोलीस अधीक्षक पंकजकुमारसिंग व उपअधीक्षक किरण पौडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शोध पथके तयार करण्यात आली. मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर, फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपील नायक, कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक टेरेन्स डिकॉस्ता, केपे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली. या पथकात गुप्तचर पोलीसही सामील झाले होते. हे पथक गोव्यात अनेक ठिकाणी पसरले गेले आाित्यांचा तपास सुरु झाला.
माशेल परिसरात एक पथक गेले होते. आरोपी खांडोळा माशेल परिसरात आसल्याचे त्या पथकाला आढळून आले आणि पोलीस अधीक सावध झाले. शेवटी, आरोपीला जेरबंद करण्यात या पथकाला यश आले. या आरोपीबरोबर मुरिडा -मडगाव येथील प्रज्योत भंडारी (28) होता. त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. या दोन्ही आरोपींना मडगावच्या पोलीस मुख्यालयात आणण्यात आले.
पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी अन्वर शेख याला अटक केली. पोलिसावच्या या कामगिरीप्रकरणी अनेकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
अटक केलेलया अन्वर शेख या आरोपीविरुद्द भारतीय दंड संहितेच्या 341 (अडविणे), 504 (शिव्या देणे), 506 (2) जीवे मारण्याची धमकी देणे, 325 (जखमी करणे) व 308 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्वप्नील वाळके या व्यापाऱयाच्या दिवसा ढवळय़ा मडगावात खून करण्यात आला होता आणि आरोपी मडगावातून सहीसलामत उत्तर गोव्यात पळून गेले होते. मात्र या प्रकरणाचा लगेचच तपास लावण्यात आलेल्या अपयशानंतर मडगाव पोलीस जनतेच्या टिकेचे धनी झाले होते.