साहित्य : 100 ग्रॅम मैदा, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तेल, 2 चमचे तेल, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 कांदा चिरून, 1 हिरवी मिरची चिरून, 1 गाजर किसून, पाव वाटी कोबी किसून, अर्धी सिमला मिरची किसून, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, 1 वाटी कॉर्नफ्लेक्स, 50 ग्रॅम मैदा, पाणी आवश्यकतेनुसार
कृती : बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात मीठ आणि तेल मिक्स करावे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून गोळा मळून दहा मिनिटे ठेवावा. गरम तेलात आलं-लसूण पेस्ट टाकावी. नंतर कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवावा. त्यात गाजर, कोबी, सिमला मिरची आणि मीठ टाकून मिश्रण शिजवावे. मळलेल्या गोळय़ाचे छोटे गोळे करून पारी लाटावी. त्याच्या मधोमध भाजीचे सारण भरून गोळा बंद करून मोदकाप्रमाणे आकार द्यावा. बाऊलमध्ये कॉर्नफ्लोर आणि पाणी मिक्स करून पेस्ट बनवावी. कॉर्नफ्लेक्सचा चुरा करावा. तयार मोमोज कॉर्नफ्लोरच्या पेस्टमध्ये घोळवावे. नंतर कॉर्नफ्लेक्सच्या चुऱयात घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. तयार मोमोज सॉससोबत खाण्यास द्या.