प्रतिनिधी / कुरुंदवाड
सवादय मिरवणुकीत आज मोठ्या उत्साहात कृष्णा वेणी मातेच्या उत्सवाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस हा उत्सव सोहळा चालणार असून उत्सव कमिटीने भजन कीर्तन गायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आज पहाटे साडेपाच वाजता उत्सव मूर्तीचा पाट सवाद्य मिरवणुकीने मुख्य मंदिरातून मानकरी जनार्दन कागलकर यांच्या घरामध्ये आणण्यात आला. आरती झाल्यानंतर कृष्णा वेळी मातेच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर संस्कार भारती मार्फत आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. तर, सुहासिनी मार्फत कृष्णावेणी मातेच्या मूर्ती औक्षण करण्यात येत होते.
सकाळी आठ वाजता मुर्तीचे आगमन मुख्य मंदीरात झाले. प.पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मठा समोर मूर्ती आल्या नंतर उपस्थित भावीक व पुजारी मंडळीनी घोरातकष्टात स्तोत्र म्हटले. मूर्ती मुख्य मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या उत्तर भागातील घाटावर उभा करण्यात आलेल्या शामीयान्यात षोडशोपचार पुजा करुन प्रतीस्थापना करण्यात आली