प्रतिनिधी / कुरुंदवाड
बेळगाव येथे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर गेले होते. त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यास कर्नाटक पोलिसांनी अटकाव केला. तसेच त्यांना धक्काबुक्की केली . या घटनेचा कुरुंदवाडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला . कुरुंदवाड मधील शिवाजी पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले आणि कर्नाटक शासनाचा तीव्र निषेध करून धिक्काराच्या घोषणा दिल्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, जवाहर पाटील, शरद आलासे, तानाजी आलासे, शब्बीर भिलवडे, मीरअहम्मद बागवान, रमेश भुजुगडे, किरणसिह जोंग,जय कडाळे, दादासो पाटील, राजू झाडवाले,उमेश कर्नाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.