प्रतिनिधी / मोहोळ
मोहोळ कुरुल विजापूर बायपास रस्त्याजवळील हॉटेल वैष्णवी या शंकर मुसळे यांच्या हॉटेल जवळ विजापूरकडून येणारा केमिकलचा ट्रक आणि गाड्याचे स्पेअरपार्ट घेऊन निघालेल्या मालट्रक या दोघांची समोरा – समोर रविवारी दिनांक 22 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास जोराची धडक लागून प्रथम केमिकलच्या गाडीला आग लागली.
त्यानंतर यामध्ये दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. या अपघाताची नोंद पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.