तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कोरोना विषाणूचा टाळण्यासाठी १९ ची टेस्ट करणे व्यापाऱ्यांसाठी अनिवार्य असल्याचा फतवा नगरपालिका मुख्याधिकारी यांनी काढला आहे.
जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार व कामगार यांची कोविड १९ टेस्ट करणे बंधनकारक केले आहे. तरी शहरातील व्यावसायिक दुकानदारांनी आपली व आपल्या कर्मचाऱ्यांची कोविड १९ टेस्ट बुधवार दि.९ रोजी येथील कै. विठ्ठलराव सभागृह पंचायत समिती, कुर्डुवाडी येथे करुन घ्यावी, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.