विविध मार्गावरील १२ बसेस धावल्या
कुर्डुवाडी / प्रतिनिधी
शिवसेनेचे सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर २९८ कर्मचाऱ्यांपैकी ८१ कर्मचारी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कामावर रुजू झाले.
कुर्डुवाडी बस स्थानकात कामगार आणि शिवसेना नेते प्रा. शिवाजी सावंत, आगार व्यवस्थापक मिथुन राठोड यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी अकरा वाजता एक बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या या आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावे. आपल्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे. त्यामुळे आता माघार घ्यावी असे आवाहन प्रा. शिवाजी सावंत यांनी कर्मचाऱ्यांना केले होते. याला ८१ कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवार पासून कुर्डुवाडी आगारातून १२ बसेस विविध मार्गावर धावू लागल्या आहेत. यावेळी कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व उर्वरित कर्मचाऱ्यांना सुद्धा कामावर हजर राहण्याची विनंती करण्यात आली.
या बैठकीला माजी उपजिल्हा प्रमुख अरविंद पवार,शहर प्रमुख समाधान दास,महिला उपजिल्हा प्रमुख आशा टोणपे,तालुका प्रमुख महिला आघाडी प्रियंका शिंदे, आरपीआयचे जितेंद्र गायकवाड, उपशहर प्रमुख आप्पा ढवळे, हंबीरराव गोरे,युवा नेते शिवराज पवार,युवराज परबत, राजाभाऊ शिंदे, शिवराज खेडकर, सौरभ इंगळे, विनायक गायकवाड, दिगंबर तोरणे, मनोज गायकवाड, अवधू नावगिरे, संतोष बागल, रोहित पवार, सागर शिंदे, निलेश सवणे, सोमनाथ हनवते, लखन शिंदे, सकलेन कादरी, दादा शिंदे आदी उपस्थित होते.