कुर्डुवाडी प्रतिनिधी
कुर्डुवाडी नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २० जागांसाठी येथे निवडणूक होणार असून त्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. कुर्डुवाडी नगरपालिकेत महिलांसाठी १० जागा, अनुसूचित जाती महिलांसाठी ३ जागा तर सर्वसाधारण महिलांसाठी ७ जागा असणार आहेत. १० प्रभागातून २० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यावर १७ मार्चपर्यंत हरकती घेता येणार आहेत.
खालील प्रमाणे प्रभागातील लोकसंख्या व प्रभाग रचना आराखडा—
प्रभाग १ मध्ये लोकसंख्या एकूण २ हजार २९३, अ.जा. ९७३,अ ज.२१
बुद्ध विहार/ करमाळा रोड, ओम हॉस्पिटल, पारधी वस्ती, रेल्वे स्लिपर गोडाऊन, देवकते वस्ती, जाधव मळा, सेंट मेरी चर्च पाठीमागे, रेल्वे शाळेच्या पाठीमागे.
प्रभाग 2 लोकसंख्या एकूण २ हजार १७६, अ.जा.७४१,अ.ज.४५
रेल्वे ग्रंथालय,आर.बी.- दोन लाईन कुर्डूवाडी, नाल साब नगर, बार्शी नाका, राम मंदिर परिसर, पाच कोठडी, राऊत वस्ती भूतबंगला, रेल्वे वेल्डिंग.
#प्रभाग ३ लोकसंख्या एकूण २ हजार ४१६ आ.जा. ८३८, अ.ज.४१
रेल्वे कॉलनी, रेल्वे कारखाना, अवताडे वस्ती, टोणपे मळा, चौधरी वस्ती, गवळी वस्ती, भैयाचे रान, शुभम नगर.
# प्रभाग ४ लोकसंख्या एकूण २ हजार १७९,अ.जा.५३५, अ.ज.२०
अवताडे वसाहत, सिद्धेश्वर नगर व जिजामाता नगर, देवकते लेंगरे, पारखे, वस्ती, जंजिरे, मदने, पोळके वस्ती, मार्केट यार्ड व हमाल चाळ.
# प्रभाग ५ लोकसंख्या एकूण २ हजार ३०८,अ.जा.१८०,अ.ज.२५
शिक्षक सोसायटी, गोल काडादी चाळ, भूषण लाॅज लाइन, चौधरी प्लॉट, आंतरभारती जवळ, साई कॉलनी.
# प्रभाग ६ लोकसंख्या एकूण २ हजार २९९,अ.जा.४४७, अ ज.३२
नेहरू नगर, पोलीस स्टेशन जवळ, खाटीक गल्ली, पोस्ट रोड, पंजाब तालीम, शिवाजी चौक, करंदीकर दवाखाना जवळ, दत्त मंदिर जवळ.
# प्रभाग ७ लोकसंख्या एकूण २ हजार २९०,अ जा.२९७, अ.जा.३४
कुंतल शहा नगर, दाळवाले गल्ली, एसटी स्टॅन्ड, म्हसोबा गल्ली, बागल मळा, एसटी डेपो, शनि मंदिर, विठ्ठल मंदिर, मोहोळकर चाळ.
# प्रभाग ८ लोकसंख्या एकूण २ हजार ४४७, अ.जा.६६०, अ.ज.१४
साठे नगर, सिद्धेश्वर नगर, गांधी चौक, शिवाजी चौक, बसवेश्वर चौक, तलाठी ऑफिस, मिठाई गल्ली, पटेल चौक, ब्राह्मण चाळ.
# प्रभाग ९ लोकसंख्या एकूण २ हजार १२५, अ.जा.५३७, अ.ज.३३.
गिताबाईचा मळा, बाळकृष्ण नगर, फिल्टर पंप, नूतन शाळा, दशरथ गोरे, नगर सरकारी दवाखाना जवळ.
# प्रभात १० लोकसंख्या एकूण १ हजार ९३०, अ.जा.१९३, अ.ज. २७
यशवंत नगर, गॅस गोडाऊन, पाणी टाकी जवळ, परबत संकुल, माढा रोड.