तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून आज घेण्यात आलेल्या ९५ रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये २५ जण बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये एकूण २१ रुग्ण हे कुर्डुवाडीचे आहेत.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वरचेवर वाढतच असून त्याबरोबर रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांनी आता गाफील राहून चालणार नाही. तर प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. आज एकाच कुटुंबातील अनेक जण बाधित होत आहेत. वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेतले पाहिजेत.
आज आढळलेले रुग्ण माढा रोड एस बी आय जवळ २, काडादी चाळ १, मार्कडवस्ती १, सिद्धेश्वर नगर ४, चौधरी प्लाॅट २, पंजाब तालीम १, सिद्धार्थनगर १, दास प्लाॅट १, पटेल चौक ३, नवी पेठ २, सातव काॅलनी २, रेल्वे काॅलनी १, राऊत वस्ती (भोसरे)१, जगदाळे नगर (भोसरे) १, टेंभुर्णी १, लऊळ १ असे एकूण २५ जण बाधित झाले आहेत. कोरोनाने आता शहरातील सर्व भागात प्रवेश केला असून आता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.