श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्हय़ात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रेडवानी बाला भागात ही चकमक झाली असून ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी दिवसभर या भागात शोधमोहीम जोरात सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. गेल्या 24 तासांतील ही दुसरी चकमक आहे. याआधी मंगळवारी रात्री पुलवामाच्या राजपुरा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.
Previous Articleमैदानावर येण्याआधी तंबूत जाण्याची भीती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.