मुंबई / वृत्तसंस्था
भारताचा डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादववर बुधवारी गुडघ्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती. 26 वर्षीय कुलदीपने ट्वीट करत शस्त्रक्रियेची माहिती दिली. खराब फॉर्ममुळे कुलदीप यादव आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर पडला असून या दुखापत व शस्त्रक्रियेमुळे त्यातून सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ द्यावा लागेल, हे निश्चित आहे. कानपूर-स्थित कुलदीपने आजवर 7 कसोटी, 65 वनडे, 23 टी-20 खेळले असून त्यात एकत्रित 174 बळी घेतले आहेत. त्याने श्रीलंकेत आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.