खा. रामदास तडस अध्यक्ष. अर्जुनवीर काकासाहेब पवार सरचिटणीस
वार्ताहर/ औंध
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद पुणे, सांगली आणि बारामती नंतर आता विदर्भाकडे सरकले आहे. कुस्तीगीर परिषदेत खांदेपालट झाला असून नागपुरचे खा. रामदास तडस यांचेकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सरचिटणीस पदी अर्जूनवीर काकासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची पदाधिकारी निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केल्यानंतर काही दिवसापासून नवीन कार्यकारणी निवडीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सर्वांना एकमताने पदाधिकारी निवडी बिनविरोध करण्यात यश आले. जाहीर करण्यात आली आहे.कुस्तीच्या इतिहासात प्रथमच कुस्तीच्या मातृसंस्थेचे अध्यक्षपद विदर्भाला बिनविरोध देण्यात आले आहे.
नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष रामदास तडस ,सरचिटणीस अर्जुनवीर काकासाहेब पवार,वरिष्ठ उपाध्यक्ष विजय बराटे
उपाध्यक्ष हनुमंतराव गावडे,वैभव लांडगे, संजय तिर्थकर, दीपक पवार,सुनील चौधरी, संजय चव्हाण खजिनदार संजय शेटे,सह-सचिव विलास कथुरे,मारुती आडकर,अनिल पांडे,वामन गाते,गोरखनाथ बलकवडे,रवींद्र पाटील,
कार्यकारी समिती सदस्य ः
योगेश दोडके,संदीप भोंडवे,ज्ञानदेव जाधव,दिलीप इटनकर,सुनील देशमुख.