वार्ताहर/ बेडकिहाळ
येथील ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर देवाचा ऐतिहासिक दसरा महोत्सव यंदा कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील सर्व सावर्जनिक स्पर्धा, विविध कार्यक्रम व विशेष म्हणजे कुस्ती मैदान रद्द करून सरकारी नियमांचे पालन करण्यात आले. केवळ मंदिरातील पारंपरिक विधी, पूजा व पालखी सोहळा साजरा करण्यात आला. बुधवारी सायंकाळी 4 वाजता दसरा महोत्सव कमिटीने केवळ पारंपरिक पद्धतीने ऐतिहासिक कुस्ती मैदानाची पूजा करून दसरा महोत्सवाची सांगता केली.
यावेळी दसरा कमिटीचे सदस्य अशोक नारे व सर्व सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत गावकामगार संदीप पाटील (पोलीस पाटील) यांच्या हस्ते सिद्धेश्वर कुस्ती मैदानाची पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजू चौगुले, सदस्य मलगोंडा पाटील, शिवाप्पा सुभेदार, सुनील नारे, विलास थरकार, अनिल देशपांडे, महावीर पाटील, चंद्रकांत कुंभार, संजय चौगुले, अशोक आरगे, अशोक सुभेदार, इरगौडा चौगुले, विजय चौगुले, पोपट सुभेदार, संतोष सुभेदार, अजित बेनाळे, पोपट पाटील, अजित धनापगोळ, दयानंद चौगुले, कल्लाप्पा चौगुले यांच्यासह दसरा कमिटी, मंदिर कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.