प्रतिनिधी / बेळगाव
मुळचे कोरे गल्ली सध्या हट्टीहोळी गल्ली रहिवासी म.ए. समितीचे नेते बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना बेळगावचे संस्थापक प्रकाशबापू लक्ष्मण पाटील (वय 73) यांचे शुक्रवार दि. 13 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.
प्रकाश पाटील यांनी कुस्तीला चालना देण्यासाठी 1980 साली कोरे गल्ली, हट्टीहोळी गल्ली व आनंदवाडी येथील मंडळीना धरुन कुस्तीप्रेमी कुस्ती संघटनेची स्थापना करुन कुस्ती जोपासली. 1985 साली बेळगाव जिल्हा कुस्तीगीर बेळगाव संघटनेमध्ये विलिनीकरण करुन कुस्ती मैदानाना पाठबळ दिली. त्यानी अनेक कुस्ती मैदाने गाजविली होती. कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी शेवट पर्यत झटत होते.त्यानी शरिरसौष्ठव मध्ये बेळगाव श्री हा मानाचा किताब पटकाविला होता. कुस्ती क्षेत्रातील आधारस्थंभ गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनाने बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना बेळगाव तर्फे श्रध्दाज्ंाली वाहण्यात आली.